गणिताचा अभ्यास करत होतो ,गणितातले कोड्याचे उत्तर लगेच मी काढत होतो ,तेवढयात मित्राचा कॉल आला आणि मी येतोय भेटायला आणि सोबत तो अजून एका मित्राला घेउन आला ..मग काय आल्यावर परिक्षेसंर्भात गप्पा सूरू झाल्या आणि काही वेळातच चर्चा अशा विषयावर येउन पोहचली की त्याचे उत्तर या पृथ्वी वर असणाऱ्या सर्व लोकांकडे शक्यतो नसेलच..नवरा,पत्नी ,घरकाम ,आई,सासू आणि बरेच काही…यांच्यातील वाद
माझे दोघेही मित्र विवाहीत ,एक मित्र त्याच्या बायकोचे स्तुती करत होता आणि दुसरा मात्र बायकोच्या चूका सांगून सांगून थकला होता..
त्याचे असे म्हणणे होते की माझी बायको काहीच ऐकत नाही,घरातील काम करण्याची पध्दत तिची चूकीची आहे,घरात एखादया सूनेने कशाप्रकारे राहिले पाहिजे हे तिला समजायला हवे पण त्यामध्ये ती कमी पडत आहे..खूप प्रयत्न केले पण तिच्या वागण्यामध्ये काय फरक जाणवत नाही..
मी सांगून सांगून थकलो की अस वागायच असते,तसे वागायचे असते पण तिच्या मध्ये बदल होत नाही..
आणि दुसरा मित्र म्हणत होता की माझी बायको माझ्या मोबाईल मधील बॅटरी ९९ टक्के असली तर लगेच चार्ज करते आणि १०० टक्के करते ,म्हणजे एवढ ती माझी काळजी घेते आणि माझी प्रत्येक गोष्ट ऐकते..पण पहिला मित्र मात्र म्हणत होता की माझी बायको काम करते आणि आई वडीलांना न बोलता ,त्यांच्याशी गप्पा गोष्टी न करता तसीश रूम मध्ये निघून जाते,म्हणजे ती आई वडीलांशी मिळून मिसळून राहत नाही..
कधी कधी खूप चांगली वागते पण कधी कधी काहीच ऐकत नाही.
किती प्रयत्न केले तरी तिला कळतच नाही..आमच्यात भांडण होत आहेत अशा गोष्टी मुळे..
मी म्हंटले की तू कधी कधी फिरायला घेउन जात जा,मन मोकळया मनाने तिच्याशी बोलत जा,परिवारामध्ये कशे वागायचे असते हे तिला शांत आवाजात ,सौम्य भाषेत समजून सांग,.
तसेच तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न कर..कारण कोणतेही भांडण संपवायचे असेल एकच मार्ग म्हणजे आपल्या वाणी वर आपले नियंत्रण,आपली भाषा जेवढी सौम्य तेवढया लवकर समोरचे भांडण मिटेल..पण मित्र म्हणाला हे पण करून बघितले पण काय फरक जाणवत नाही..
तिच्या स्वभावामध्ये काय फरक जाणवत नाही..पहिले पाढे पंच्चावन..
बाहेर जेव्हा तिला फिरायला घेउन जातो तेव्हा ती काही गोष्टींचा आग्रह करते त्या पैकी मला जेवढया शक्य आहेत त्या गोष्टी मी पुरवतो..पण समजा एखादी गोष्ट घ्यायची आहे पण आपल्या महिन्यातील जमा खर्चाचा विचार करून मी तीला ती गोष्ट घेण्यास नकार देतो..
दुसरा मित्र म्हणाला माझी बायको कधीच म्हणत नाही की मला बाहेर फिरायाल घेउन जावा,कारण तिला माहीत आहे सर्व गोष्टी ,आणि ती समजूदार पण आहे ..माझ्या शब्दाच्या बाहेर ती कधीच जात नाही..
पहिला मित्र शेवटी म्हंटला की ती माहेरी गेली आहे आणि तिला वापस यायचे असेल तर ,काही नियम ,स्वत:मध्ये काही बदल करावा लागेल,म्हणजे बाहेर जायचे असेल घरातील सर्व कामे करून जाणे,आई वडील म्हणतील तसेच वागणे ,आई वडीलांचा आदर करणे,मिळून मिसळून राहणे..
पहिला मित्र मात्र त्याच्या पत्नी बद्दल सर्व काही चांगल्या गोष्टी सांगत होता…पण दुसरा नकारात्मक गोष्टी..असो
याच्यावर माझे मत असे आहे की माणसांना काही नियम घालून त्यामध्ये बदल नाही घडवता येणार,तूमच्या बद्दल त्याच्या मनात प्रेम निर्माण होयला पाहिजे,तूम्ही त्याचे मन जिंकणे गरजेचे आहे,तूमच्या जीवनात ती व्यक्ती किती महत्वाची आहे याची जाणीव करून दिली पाहिजे..एखादे नाते टिकवायचे असेल तर त्या नात्या मध्ये कोणी तरी काही गोष्टी चा त्याग करणे गरजेचे असते,का रे ला कर म्हंटले की नात्यामध्ये दुरावा निर्माण होउन अजून भांडण होतात..
चूक कोणाची का असेना ,पतीची असो की सासू ची असो ,की आपल्या सासरे बुवाची असो,का आपल्या पत्नीची असो, आपल्या माणसातल्या चूका काढण्यापेक्षा त्याच्या बद्दल आनंदाने कसे राहता येईल याला प्राधान्य द्यायला पाहिजे अशा अनेक गोष्टी मित्राच्या कानावर मी ऐकवल्या शेवटी तो म्हणून गेला की तूला लग्न झाल्यावर समजेल गप बस तू
लेखक : राम ढेकणे