आपल्या शहरात मोठ मोठया बिल्डींग तयार होत आहेत,मोठ मोठया शाळा निर्माण होत आहेत,वेगवेगळे व्यवसाय आपली माणसं उभा करत आहेत, महागडया गाडया रस्त्याने दिसत आहेत,लोकांकडे पैसा पण भरपूर येताना दिसत आहे..पण त्यांना लागलेले व्यसन काय सुटताना दिसत नाही..पूडया खायचे व्यसन काय सुटताना दिसत नाही.
मग काय शिपायापासून ते शिक्षकापर्यंत ,बांधकाम करायला येणाऱ्या कामगारापासून ते ठेकेदारपर्यंत ,अधिकारी लोकापासून ते आमदारापर्यंत सर्रास पूडया खाताना दिसत आहेत..लपून का होईना पूडया खाणे माणसांनी सोडलेले नाही..
काही कंपनी वर बंदी असताना दुसऱ्या नावाने त्या कंपन्या प्रोडाक्ट तयार करून परत पूडया बाजारात येत आहेत..बादशाह नावाची पूडी सर्रास बाजारात खाताना सर्व जण दिसत आहेत.
आता पूडी खायची का नाही हे वैयक्तिक प्रश्न असला तरीही आपण खात असलेल्या पदार्थामुळे जर आपल्या पर्यावरणांचे नुकसान होत असेल,कचरा निर्माण होत असेल तर याला जिम्मेदार तो पुडी खाणारा जेवढा आहे तेवढाच ज्या कंपनी ने ही पूढी बनवली आहे ती कंपनीसुध्दा जिम्मेदार आहे.
एकतर या पूडयाचा आकार लहान असल्यामूळे या कोणाकडून ही उचल्या जात नाहीत,नगरपालिकेतील कर्मचारी फक्त मोठया आकाराच्या वस्तू उचलतात,अशा लहान वस्तू त्या उचलत नाहीत..याची विल्हेवाट लावायची यंत्रणा नगरपालिकेकडे नाही.
आता जे पूडया खातात त्यांनातर नैतिक आपली जबाबदारी असते हे जर माहित असते तर त्यांनी ती पूडी खावून कचराकूंडीमध्ये टाकली असती..पण त्यांना आपली नैतिक जबाबदारी आहे याचे भानच नसल्यामूळे ते सर्रास पूडी खावून रस्त्याने फेकतात..ज्या ठिकाणी ते उभे आहेत त्या ठिकाणी ते फेकून देतात..मग ते ठिकाण एखादा चौक असेल ,किंवा हॉस्पीटल असेल,शाळा असेल,किंवा खासगी मोकळी जागा असेल,कोणतेही कार्यालय असेल त्याच्या आसपास ते फेकून देतात..म्हणजे यांच्याकडून अपेक्षा करणे चूकीचे आहे.
मग राहिला प्रश्न ज्या कंपनी ची ही पूडी असेल त्यांना हे कळायला पाहिजे की आपण एकतर लोकांना व्यसन लावत आहोत आणि त्यात अजून भर म्हणजे आपण असा कचरा निर्माण करत आहोत जो कोणतेच कर्मचारी त्याची विल्हेवाट लावताना दिसत नाहीत.
असा कचरा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे..मग कंपनी ने आपली नैतिक जबाबदारी लक्षात घेउन याच्यावर उपाय करणे गरजेचे आहे..जर कंपनी जर याच्यावर उपाय करत नसेल तर सरकार ने हस्तक्षेप करून अशा पूडया बंद करायला पाहिजे..जर कंपनी स्वत: केलेल्या पदार्थापासून होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावत नसेल तर सरकारने कायदा करून अशा कंपनी वर कारवाई करण्याची वेळ आलेली आहे.
जो खाणारा आहे त्याने याची जबाबदारी उचलायला पाहिजे नाहीतर जो हा पदार्थ बनवून लाखो रूपये कमवत आहेत त्या कंपनीवर वचक बसवण्याची हीच ती वेळ, कारण अशा लहान कचऱ्यामुळे नदी प्रदूषित होत आहेत..तसेच आजूबाजूचा परिसरात सुध्दा घानीचे साम्राज्य निर्माण होत आहे.
लोकांच्या आरोग्यसाठी नको पण कमीतकमीत पर्यावरणाचें रक्षणांसाठी तर याच्यावर काम करण्याची वेळ आली आहे..नाहीतर एकदिवस अशा पूडयाची संख्या वाढत जाईल..त्याचा दुष्परिणाम खूप आहेत.त्यापैकी एक म्हणजे जनावरांच्या खाण्यामध्ये हे लहान आकाराचे प्लॅस्टिक जाण्याची शक्यता आहे..त्यामुळे जनावरांना प्रचंड त्रास सहन कराव लागेल भविष्यामध्ये..
दुसरा असा की नदी मधील असणाऱ्या जीवाला सुध्दा यामुळे प्रचंड नुकसान होत आहे..अशा अनेक गोष्टीचा विचार करून सरकारने किंवा त्या कंपनी ही जबाबदारी घेउन योग्य ते पाउल उचलण्याची ही वेळ आली आहे.