सिनेमा

जवळपास सर्वांना आवडणारी बाब म्हणजे सिनेमा पाहणे. प्रत्येक जण सिनेमा,चित्रपट कधी ना कधी पाहतच असतो,काही जण तर अशे असतात प्रत्येक चित्रपट पाहतात..काही जण कधी तर चित्रपट पाहतात आणि माझ्या सारखे काही जण जसा वेळ भेटेल तसा अधून मधून एखादा दुसरा चित्रपट पाहतच असतात.

खूप दिवस झालते चित्रपट सिनेमा हॉल मध्ये जाउन पाहिलेला नव्हता..तो योग आलाच ब्रम्हास्त्र या सिनेमाच्या निमित्ताने .मग काय २३ संप्टेबर हा सिनेमा दिवस असल्यामुळे आज तिकिट पण माफक होते.

आणि दुसरी बाब मध्ये आमच्या उस्मानाबाद मध्ये प्रथमच ३ डी मधे प्रथमच चित्रपट पाहता येणार होते..आणि आता या पूढे आमच्या धाराशिव मध्ये ३ डी मध्ये सिनेमा पाहण्याची सोय झाली आहे..धाराशिव बदल रहा हे…देश बदल रहा हे ,हमारा गाव बदल रहा हे..असे आम्ही आता म्हणू शकतो.

इतके दिवस धाराशिव रहिवाशांसाठी फक्त एक स्क्रीन उपलब्ध् होती. आता मल्टीप्लेक्स आमच्या शहरात आलेले आहे..त्याचा आनंद घेण्यासाठीच मी चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला आणि दुसरी बाब म्हणजे ३ डी चित्रपट आणि ते पण कमी पैशा मध्ये ..मग काय घेतला निर्णय आणि घेतला अनुभव ३ डी चा.

मला जेथे जाईल तेथे चूका काढण्याची सवय लागली आहे.त्याप्रमाणे या ठिकाणी पण मी तेच केले..थेटर चा आवाज चांगला,बसण्याची व्यवस्था चांगली,सगळी कडे मस्त वातावरण पण लोकांची सवय काय बदलत नाही.

पैशे देउन आपण सिनेमा पाहण्यासाठी जातो मग समजा चित्रपट ६ वाजता असेल तर आपण सगळयांनी ६ ला पाच मिनिट कमी असताना किंवा ६ च्या अगोदर यायला पाहिजे..पण वेळेवर येणे ,वेळेवर आपले कामे करायचे असतात हे लोकांना कधी समजणार..६ चा शो चालू झाला ,सिनेमाचे काही १५ मिनिट झाले तरीही प्रेक्षक येतच होते..काही जण अर्धा तास उशिरा आले,काही जण उशिरा आले तर जाउन गपचूप आपल्या सिट वर बसावे तर ,मोठमोठयाने बोलत बोलत येत होते,काही जण आपल्या मोबाईलचा प्रकाश लावून सगळया हॉल मध्ये मोबाईल फिरवत होते…हे जरा खटकले..

तूमच्या मुळे इतरांना त्रास होत आहे हे लोकांना कधी कळणार..आपल्या वागण्यात हे कधी बदल करणार..म्हणजे आम्ही तिकिट उशिरा लोक कशे येतात हे पाहण्यासाठी काढले आहे का..आपल्या वागण्याचा दुसऱ्याला त्रास होता कामा नये हे लोकांना कधी कळणार..

बर आल्यावर शांत बसावे का .चित्रपट चालू असताना एकमेकांना बोलतात ,अरे चित्रपट पहा ना,घरी गेल्यावर बोला एकमेकांना…

असो ..चित्रपटा बद्दल बोलूया..ब्रम्हास्त्र हा चित्रपटामध्ये व्ही एफ एक्स चा वापर खूप चांगल्या पध्दतीने केला आहे..पण लेखकांने कहानी लिहिली पण त्यामध्ये डॉयलाग लिहिताना कूठेतरी लेखक किंवा डॉयलाग लिहिणारा कमी पडला..एक एक क्षण तर असे आहेत की बळच लोक हसत होते..

कलाकार चांगले आहेत,इफेक्टस चांगले दिले आहेत,कहानी चांगली आहे पण कहानी मध्ये जो मसाला पाहिजे होता तो कुठे तरी कमी पडल्याचे निदर्शानास आले..पण जे काय कॅमेरा बापू ने मेहनत घेतली आहे त्याला सलाम..

आपल्या डायरेक्टर,आपले प्रोडूसर यांना खरेच सलाम की ते प्रयत्न करत आहेत नविन नविन करण्याचा ,त्या मध्ये अशे एखादे प्रोजेक्ट फेल तर होणारच.पण त्यांच्या मेहनतीला सलाम..अजून प्रयत्न करा चांगले आणि अजून आम्हाला नविन दाखवण्याचा प्रयत्न करा..आम्ही नक्की सिनेमाला दाद देउ..

असाच एक चित्रपट आला होता थग्स ऑफ हिंन्दुस्थान ,तो पण एक नविन काहीतरी देण्याचा प्रयत्न होतो.पण लेखकाला,तसेच डायरेक्टरला ते नाही जमले पण अशे प्रयोग होत राहिल्याना नंतरच एक दिवस आपल्या असे काही बगायला भेटेल की त्या मध्ये चूका काढायला काहीच उरणार नाही..उदा..के.जी.फ सारखे चित्रपट.

असो ,आमच्या धाराशिव मध्ये सिनेमा उ डी मध्ये बघता येणार याचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे..

लेखक : राम ढेकणे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top