चित्ता आणि कोल्हापूर
आज भारतात आफ्रिकेतून चित्ते आणले गेले. एक काळ असा होता की भारतातही अक्षरशः हजारोंनी चित्ते उपलब्ध होते. सम्राट अकबराकडे एकाच वेळी एक हजार चित्ते त्याच्या शिकारखाण्यात उपलब्ध असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. भारतातीय चित्ते अतिरिक्त शिकारीमुळे आणि चित्त्यांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे लुप्त झाले. आम्ही इतिहासाचा अभ्यास करत असताना कोल्हापुरातील चित्त्यांचे काही संदर्भ मिळून आलेत. राजर्षी शाहू …